होमगार्डला मारहाण प्रकरणी आरोपीस ३ महिने सश्रम कारावास

अपनी भाषा में पढ़े! Translate

होमगार्डला मारहाण प्रकरणी आरोपीस ३ महिने सश्रम कारावास

 

अमळनेर : विक्की जाधव

सुभाष चौकात वाहतूक नियंत्रण ड्यूटीवर असलेल्या होमगार्ड दिलीप मराठे आणि ललित पाटील यांना मारहाण करणाऱ्या इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा (वय 29, रा. पानखिडकी, अमळनेर) यास अमळनेर न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण करत होमगार्डच्या अंगावर धाव घेत शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली होती.

सदर प्रकरणात अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न. 663/2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात (सेशन केस क्र. 08/2021) खटला सुरू असताना मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. डी. गायकवाड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील अ‍ॅड. के. आर. बागुल यांनी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी व इतर ६ साक्षीदारांच्या साक्षींवर आधारित युक्तिवाद सादर केला. यामध्ये आरोपीस भा.द.वि. कलम 353 नुसार ३ महिने व दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!