ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन या राज्यस्तरीय सरपंच संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी सतीश भोई यांची निवड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन या राज्यस्तरीय सरपंच संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी सतीश भोई यांची निवड..
प्रतिनिधी:- अजिनाथ कनिचे
ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय आजिनाथ धामणे पाटील उपाध्यक्ष प्रमोद जी भगत प्रदेश सचिव विशाल जी लांडगे पाटील यांच्या आदेशानुसार ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन या राज्यस्तरीय सरपंच संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस या पदावरती माननीय सतिश भुई, ग्रामपंचायत पिराची कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांची नियुक्ति करण्यात येत आहे. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत बळकटी करण्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी माननीय श्री सतिश भुई यांचे ग्राम स्तरावरील विविध विकास कामाचा आढावा घेऊन तसेच संघटनेत मध्ये संघटन कौशल्य पाहून त्यांच्यावर संघटनेचे मुख्य पदाधिकारी यांनी सर्वां नुमते प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे यांच्या निवडीमुळे संघटनेच्या माध्यमातून गावपातळीवरील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना सक्षम बनवण्याचे व शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम श्री. भुई हे यापूर्वीपासून करत आले आहेत. त्यांच्या या अनुभवामुळे त्यांची निवड झाली असून, राज्यभरातील ग्रामपंचायत प्रतिनिधींना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ग्राम स्तरावर विविध विकास कामांचे अंमलबजावणी करण्याकरता व विविध शासकीय योजना यांची माहिती देणे संघटनेची गाव दत्तक योजना औद्योगिक कंपन्याकडून सीएसआर फंड ग्रामपंचायतला उपलब्ध करून देणे अशी विविध विकासकामे करणे बाबत मार्गदर्शन करणे तसेच वेळोवेळी संघटनेच्या मार्गदर्शनाने नवनवीन विषय मांडणे व त्याचे अंमलबजावणी करणे अशी कामे करून संघटना महाराष्ट्रात सर्व गावामध्ये पोहचवण्याचे काम करतील त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असे मत संघटनेचे अध्यक्ष आजिनाथ धामणे पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार माननीय प्रदेश सचिव विशाल लांडगे पाटील यांनी व्यक्त करताना मा सतिश भुई हे राज्यशास्त्र या विषयाचे पदवीधर असून त्यांनी एम. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले असून, त्याचा महाराष्ट्रात प्रत्येक गावा गावामध्ये संघटना वाढवणे करता नक्कीच फायदा होईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!