संजयमामा शिंदेंनी मंजूर केलेल्या विकासकामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा(प्रतिनिधी)- किल्लावेस ते सदरा(फुलसौंदर) चौक दरम्यान वेताळपेठेतील दोन्ही बाजूंची काँक्रीट गटारे बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ नगरपरिषदेचे नगर रचनाकार शशांक भोसले यांचे हस्ते व सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळाचे स्थापत्य अभियंता संदीप नवले यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी या विकासकामांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.३१ जुलैला असलेल्या
संजयमामा शिंदेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास संयोजक तथा मकाईचे माजी संचालक विवेक येवले,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे,जिल्हा उपाध्यक्ष ऍड.नितीनराजे भोसले व अशपाकभाई जमादार,शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड,तालुकाध्यक्ष किरण फुंदे,तालुका कार्याध्यक्ष सुजित बागल,तुषार शिंदे,सूरज ढेरे,सचिन वैकर,उदय येवले,राहुल वनारसे,प्रफुल्ल शिंदे,उद्धव वीर,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नंदिनी लुंगारे,तालुका उपाध्यक्ष सौ.शिंदे,ठेकेदार प्रकाश माने आदींसह शिंदे समर्थक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!