प्रशासकीय सेवा हे एक प्रेरणादायी करिअर – योगेश पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर : विक्की जाधव
करिअर कौन्सेलिंग सेंटर, प्रताप कॉलेज आणि पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय केंद्र, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी UPSC ची उपक्रमांतर्गत UPSC (IRMS) मध्ये यश मिळवलेले अधिकारी श्री. योगेश पाटील (AIR-811) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान प्रताप महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात २८ जुलै रोजी पार पडले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते.

श्री. योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेचे स्वरूप समजावून सांगत अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या शिस्त, वेळेचे नियोजन, सातत्य व आत्मविश्वास या घटकांवर भर दिला. “प्रशासकीय सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे,” असे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहण्याचे व त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, डॉ. अमित पाटील, डॉ. विजय तुंटे यांच्यासह विविध प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. घनश्याम पाटील यांनीही विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा अतिरेक टाळण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विजयसिंग पवार यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. एस. तुंटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. हर्ष नेतकर यांनी केले.
कार्यक्रमास 135 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून नवचैतन्य, ऊर्जा आणि UPSC परीक्षेबाबत स्पष्ट दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.