अमळनेर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था : मुंदडा नगर ते रघुराजस नगरपर्यंत खड्ड्यांचा कहर!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था : मुंदडा नगर ते रघुराजस नगरपर्यंत खड्ड्यांचा कहर!

 

अमळनेर  : विक्की जाधव

शहरातील विविध रहिवासी भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषतः मुंदडा नगर 1, कस्तुरबा बाग, गजानन महाराज मंदिर परिसर, आर. के. नगर मागील भाग, संताजी नगर, सुरभी कॉलनी, विद्या विहार कॉलनी, सप्तशृंगी नगर आणि राजाराम रघुराजस नगर या ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मात्र दुर्लक्षितच राहिले आहेत.

या भागांतील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे दैनंदिन जीवनात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी हे रस्ते धोकादायक ठरत आहेत. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांत साचणाऱ्या पाण्यामुळे अपघाताची शक्यता अधिकच वाढते.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या प्रश्नावर न लोकप्रतिनिधी बोलत आहेत, न पालिका प्रशासन. नेरकर खिसा भरण्यात व्यस्त असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. या भागातील नागरी सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित रस्त्यांचे डागडुजी व डांबरीकरण व्हावे, अशी जोरदार मागणी आता शहरवासीयांकडून केली जात आहे. अमळनेर नगर परिषद व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!