भिगवण रोटरी क्लब च्या अध्यक्ष पदी निखिल बोगावत तर सचिव पदी कुलदीप ननवरे यांची निवड
(निलेश गायकवाड)
रोटरी क्लब भिगवण च्या अध्यक्षपदी निखिल बोगावत यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष संतोष सवाने यांनी आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे निखिल बोगावत यांना दिली. तसेच सेक्रेटरीपदी कुलदीप ननवरे यांची नियुक्ती झाली.दि. 25 जुलै 2025 रोजी हा निवडीचा कार्यक्रम राधा कृष्ण हॉटेल या ठिकाणी पार पडला..
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितीनजी ढमाले, नरेंद्र गांधी, अतुल कुलकर्णी आदिजन रोटरीचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी मागील वर्षभरातील रोटरीच्या उपक्रमांची माहिती चलचित्रासहित रोटरी क्लब मावळते अध्यक्ष संतोष सवाने यांनी सादर केली.
निखिल बोगावत यांची थोडक्यात ओळख म्हणजे ते उत्कृष्ट व्यावसायिक आहेत, संघटन कौशल चांगले आहे, असंख्य मित्रपरिवार आहे, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. रोटरी च्या माध्यमातून भिगवण परिसरात काम करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले..
यावेळी भिगवण पोलीस स्टेशनं चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,रोटरी क्लब भिगवण चे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, महेश शेंडगे,संपत बंडगर, रणजित भोंगळे, प्रवीण वाघ, रियाज शेख,किरण रायसोनी, संजय चौधरी, संजय खाडे, अफजल सय्यद, अमोल खानावरे, तुषार क्षीरसागर, कमलेश गांधी, धरेंद्र गांधी, नामदेव कुदळे, भारत भरणे, प्रदीप वाकसे, दिनेश कोन्नूर, औदुंबर हुलगे, शाम सातार्ले, विठ्ठल थोरात आदिजन..
तसेच नवीन मेंबर अजिंक्य माडगे, दत्तात्रय pachangane,संदीप वाकसे, भावेश धवडे,विशाल पटेल आदिजन..
