मुख्याधिकाऱ्यांचे धाडसपणाचे पाऊल ठेकेदाराचे पुनरागमन रोखले! 

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुख्याधिकाऱ्यांचे धाडसपणाचे पाऊल ठेकेदाराचे पुनरागमन रोखले! 

 

अमळनेर : विक्की जाधव

मार्मिक समाचारने प्रसिद्ध केलेल्या बातमीची तात्काळ दखल घेत अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी संबंधित वादग्रस्त ठेकेदाराचे पुनरागमन रोखत एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. 

भाग- 4

भ्रष्टाचाराच्या सावटाखाली असलेल्या ठेकेदाराला पुन्हा संधी न देणे हे प्रशासनाच्या पारदर्शकतेचे उदाहरण ठरले आहे. मुख्याधिकाऱ्यांचे हे पाऊल निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.

मात्र, यामध्ये खरे गालबोट ठरले ते सामान्य मजुरांवरचा अन्याय. मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कंत्राटी मजुरांना अमळनेर शहरातील पाणीपुरवठा संदर्भात एक अन एक व्हॅल् ची खतराजमा आहे. या ठिकाणी नवीन मजूर काम करण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. थेट राजकीय हस्तक्षेपातून स्थानिक आमदारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना मजूर पुरवठ्याचा नवीन ठेका देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यामागे मोठा राजकीय दबाव असल्याचा संशय अधिकच होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शक निविदा केव्हा निघाली, की फक्त कागदी घोडे नाचवले गेले आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वीपासून काम करणारे प्रशिक्षत मजूर कामाला ठेवले जाणार की नाही, याबाबत अजूनही सुस्पष्टता नाही.

कामगारांच्या पोटाचा प्रश्न असताना राजकीय हस्तक्षेप होणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे अमळनेर न.पा. प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे, हे लवकरच ‘मार्मिक’ संपूर्ण पुराव्यानिशी उघड करणार आहे.

ज्यांचं श्रमशक्तीत योगदान आहे त्यांनाच दूर लोटून, केवळ राजकीय जवळीक दाखवणाऱ्यांना संधी दिली जाणार असेल, तर ‘न्याय’ या शब्दाचा अर्थच मुळातून संपेल!

वाचत रहा मार्मिक समाचार 

भाग- 5 पुढील वृत्तात

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!