“ओम साई राम” च्या जयघोषात अमळनेर ते शिर्डी पदयात्रा उत्साहात रवाना!
अमळनेर : विक्की जाधव
संताजी चौक, भोईवाडा येथील ओम साई सेवा समितीतर्फे यंदाही पारंपरिक अमळनेर ते शिर्डी पदयात्रेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. सलग १८व्या वर्षी आयोजित करण्यात आलेली ही पदयात्रा दि. २० रोजी सकाळी ९ वाजता भक्तीमय वातावरणात रवाना झाली. “ओम साई राम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात रथ पूजनाने करण्यात आली. रथ पूजनाचे सौभाग्य भाजपचे शहराध्यक्ष योगेश महाजन व नगरसेवक भाऊसाहेब महाजन यांना लाभले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखी पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजू फापोरेकर, वसुंधरा लांडगे, ॲड. तिलोत्तमा पाटील, डीवायएसपी विनायक कोते, पी.आय. दत्तात्रय निकम, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, माजी प्रशासक संजय चौधरी,सुभाष मामा पाटील, समाजसेवक मनोज शिंगाणे, राजाराम चौधरी, माजी नगरसेवक श्रीराम चौधरी, सुधीर चौधरी, नितीन महाजन,आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ओम साई सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष संजय (बापू) चौधरी, डॉ. राजेंद्र पिंगळे, सुभाष चौधरी पाटील, हरीश चौधरी, मनोहर साळुंखे, चंदू कोळी, अनिल चौधरी, योगेश मकवाना, नंदलाल चौधरी, प्रवीण भोई, यशवंत शिंगाणे, निंबा कोळी, पांडू लांडगे, राजू मोरे, संजय भामरे, रोहित महाजन, यशवंत चौधरी व जगन चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या भक्तिपूर्ण पदयात्रेने पुन्हा एकदा श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे प्रतीक ठरवत संपूर्ण शहराला भक्तिरसात न्हालवले.
