ज्ञानसंस्कारांचा दीप सतत तेवत राहो… प्रा. देवेश प्रवीणकुमार भावसार सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक म्हणजे केवळ एक पद नव्हे, तर एक जबाबदारी, एक ध्यास आणि एक सतत जागृत असलेली प्रेरणा…
खान्देश शिक्षण मंडळाच्या डी.फार्मसी आणि बी.फार्मसी महाविद्यालयात सहा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. देवेश प्रवीणकुमार भावसार सर यांचं व्यक्तिमत्त्व हे याच प्रेरणेचं जिवंत रूप आहे.
विशेष म्हणजे शिक्षण हा त्यांचा केवळ व्यवसाय नसून तो त्यांच्या रक्तातच आहे. त्यांचे वडीलदेखील याच संस्थेचे उपप्राचार्य म्हणून अनेक वर्षं कार्यरत होते. संस्थेच्या उभारणीत व शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आजही विद्यार्थ्यांच्या स्मृतीत आदराने कोरलेलं आहे.
हेच संस्कार, हेच शिक्षणाचं बीज आता देवेश सरांच्या रूपाने फुलत आहे – दुसऱ्या पिढीतून ज्ञानदानाचा अभिमानास्पद वारसा सुरू आहे.
सरांचा विद्यार्थ्यांशी असलेला ममत्वपूर्ण व्यवहार, प्रत्येकाला समजून घेण्याची नम्र शैली, आणि शैक्षणिक विषयांसोबतच जीवनमूल्यांचंही दिलं जाणारं बाळकडू… हे सगळं त्यांच्या अध्यापनात प्रकर्षाने जाणवतं.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण मित्र परिवार आणि विद्यार्थ्यांच्या मनात एकच भावना भरून आली आहे.
“सर, तुमच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आमच्या आयुष्यात लाभणं हीच आमची मोठी भाग्य गोष्ट आहे.”
वडिलांच्या संस्कारांचे तेज, आपल्या मेहनतीचं बळ आणि ज्ञानदानाची निष्ठा यामुळे भावसार सरांचा शैक्षणिक प्रवास हे नव्या पिढीला लाभलेलं अमूल्य देणं आहे.
आज त्यांच्या वाढदिवशी, ईश्वरचरणी प्रार्थना..
आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य, यश, समाधान आणि विद्यार्थी घडवण्याचा प्रेरणास्रोत राहण्याची ताकद अखंड लाभो.
प्रा. देवेश प्रवीणकुमार भावसार सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर्व मित्र परिवार