महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांच्याकडे केली इंदापूर च्या तहसीलदार यांची तक्रार;तहसीलदार व ऑफिस कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणेबाबत दिले निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांच्याकडे केली इंदापूर च्या तहसीलदार यांची तक्रार;तहसीलदार व ऑफिस कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी होणेबाबत दिले निवेदन

(निलेश गायकवाड)

इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सूचना कराव्यात , अशी मागणी भाजपा इंदापूर तालुका अध्यक्ष तेजस देवकाते यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे

देवकाते यांनी म्हंटले ता.इंदापूर जिल्हा पुणे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कामाची पद्धत फारच संत गतीने आहे व तहसीलदार हे सर्वसामान्य जनतेला फार वेळ कमी देतात एखाद्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात कोणत्याही सर्वसामान्यांचे फोन उचलले जात नाहीत त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील स्थानिक सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे हितसंबंध जोपासून तहसीलदार काम करत आहेत.कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे तालुका दंडाधिकारी साहेब यांचे असताना देखील त्यांच्याकडून नेहमीच याउलट काम तालुक्यात होताना दिसत असल्याचे देवकाते यांनी उदाहरण देऊन त्यामध्ये असे सांगितले काही दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजाच्या छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या संदर्भात एक रस्ता रोको आंदोलन इंदापूर या ठिकाणी करण्यात आले होते या आंदोलनाला प्रमुख म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते यावेळी तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारे समजूतदारपणाची भूमिका न घेता आडमुट भूमिका घेतली त्यामुळे अधिक वेळ हे आंदोलन चिघळले असल्याचे सांगितले.

त्याच्याबरोबर देवकाते बोलताना सांगितले अनेक प्रकार वारंवार इंदापूर तालुक्यामध्ये घडत आहेत तहसीलदार यांच्याकडून सर्वसामान्य प्रश्नावर लक्ष दिले जात नाही ऑफिसला वारंवार हेलपाटे सर्वसामान्य नागरिकांना मारावे लागतात त्यामुळे नागरिकांमध्ये चिडीचे वातावरण निर्माण झाला आहे अनेक नागरिक भेटून वेळोवेळी तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत त्याचबरोबर संबंधित *तहसील ऑफिस मधील कर्मचारी सर्वसामान्य माणसांना पूर्ण वेळ न देता आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे व मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याचे निवेद्वारे सांगितले आहे.
तसेच *रस्त्याचे प्रकरण निकाला अभावी अडकून पडले असल्याचे नागरिकांकडून करून समजते असे देवकाते यांनी बोलताना सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदार जीवन बनसोडे व तहसीलदार ऑफिस मधील अधिकारी यांच्या कार्यपद्धतीची कामाची सखोल चौकशी व्हावी व योग्य ती कार्यवाही करून तहसीलदार यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी तेजस देवकाते यांनी निवेदनाद्वारे केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!