अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलन – ‘मजुरांचा शोषण आणि पांडूचा कमिशनखोरीचा खेळ उघड’
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेमध्ये काल काही तरुणांनी आंदोलन उभं केल परिश्रम मजूर सहकारी संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात जयेश सुभाष पाटील, शुभम आधार यादव आणि दीपक बोरसे या युवकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे लेखी आश्वासनासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी यांनी लेखी उत्तर देण्याऐवजी स्वतःची केबिन बंद करून बाहेर निघून गेल्याने संतप्त तरुण कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाची दखल घेत उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करून तरुण आंदोलकांची समजूत काढली आणि संध्याकाळी ४ वाजता चर्चेसाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. परंतु या प्रकरणातील मुख्य मुद्दा म्हणजे राज्य शासनाच्या नियमांनुसार कॉन्ट्रॅक्ट लेबर (मजुरांना) किमान वेतन देणे कायद्याने बंधनकारक आहे. ते त्यांच्या बँक खात्यात. मात्र, परिश्रम मजूर सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या मजुरांना पांडू नावाचा एजंट किमान वेतनापेक्षा कमी रक्कम देत असून दर मजुरामागे मासिक रुपये ५,००० पर्यंतचे ‘कमिशन’ घेत असल्याची धक्कादायक माहिती मार्मिकच्या हाती लागली आहे. काही कॉन्ट्रॅक्ट लेबर यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून, मुख्याधिकाऱ्यांची यामध्ये भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नागरिकांचा आरोप दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला असते कुलूप
दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप असते, मग नागरिकांनी आपल्या तक्रारी कुणाकडे करायच्या? असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्याधिकारी सामान्य नागरिकांच्या अडचणी ऐकायला वेळ काढत नाहीत, मात्र त्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्यांचे वाढदिवसास मात्र अगत्याने हजार होतात! असा टोला संतप्त आंदोलकांनी लगावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ देखील मार्मिकच्या हाती लागले आहेत. यासंदर्भात मार्मिक ने वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात पालिकेच्या मुख्यअधिकाऱ्यांवर कारवाईचे टांगती तलवार आहेच.
नागरिकांच्या प्रतिक्रिया..
“मुख्याधिकारी तुषार नेरकर हे फक्त मलिदा खाण्यासाठी बसलेत का?”
“पांडूला पाठीशी घालण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?”
“त्याच्यावर कार्यवाही कधी होणार?”
हे आणि असे अनेक सवाल आता शहरभर चर्चेचा विषय ठरत आहेत. मुख्याधिकारी नियमित अनुपस्थित राहतात आणि कार्यालयीन वेळेत देखील फोन उचलत नाहीत, बऱ्याच वेळा उपमुख्याधिकारीच सर्व निवेदने स्वीकारतात व सही करतात, ही बाबही आता प्रकाशझोतात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
भाग 2 पुढील वृत्तात वाचत राहा मार्मिक समाचार