करमाळा नगरपरिषदेच्या घंटागाडीवर मराठी गाणी वाजवा- संजय बापू घोलप, मनसे तालुका अध्यक्ष

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरामध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या सुरू आहेत. शहरातील कचरा संकलित करतेवेळी सदर गाडीवर हिंदी भाषिक गाणी वाजवून नागरिकांना गाडी आल्याचे सूचित केले जाते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असल्याने समस्त महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे. तसेच सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार करमाळा मनसे तालुका प्रमुख संजय घोलप यांनी मुख्याधिकारी करमाळा नगर परिषद यांना निवेदन देत घंटागाडीवर मराठी गाणी वाजविण्यासंदर्भात आवाहन केले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घोलप यांनी दिला आहे.
यावेळी मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या भावना गांधी, मनसे महिला शहराध्यक्ष संगीता नवनाथ क्षीरसागर, योगेश काळे, नवनाथ क्षीरसागर, उमेश सुरवसे, रोहित फुटाणे, नागेश दुधाळ आदी जण उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!