June 28, 2025 2:06 pm

“शिंदेंचा खरा राजकीय जन्मदाता – उध्दव ठाकरेच!”

अपनी भाषा में पढ़े! Translate

“शिंदेंचा खरा राजकीय जन्मदाता – उध्दव ठाकरेच!”
एकनाथ शिंदेंचा – ऐतिहासिक सत्य काय सांगतं?

शिवसेनेचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आणि मराठी माणसाच्या संघर्षांचा इतिहास. आज या पक्षाचे नाव घेऊन स्वतःला बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदेंचा खरा चेहरा उघड करणं गरजेचं आहे.

शिवसेनेची स्थापना – आणि शिंदे कुठे होते?

शिवसेनेची स्थापना: १९ जून १९६६ रोजी

एकनाथ शिंदेंचा जन्म: ८ फेब्रुवारी १९६४
याचा अर्थ शिवसेना स्थापनेवेळी शिंदे अवघे २ वर्षांचे होते. मग ते कोणत्या आधारावर स्वतःला शिवसेनेचा आधारस्तंभ म्हणवतात?

शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं संकल्पस्वरूप होतं. त्या स्थापनेत एकनाथ शिंदेंचं कोणतंच योगदान नव्हतं – हे वास्तव आहे.

राजकीय कारकीर्द – खरे मार्गदर्शक कोण?

शिंदे वारंवार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख करून उध्दव ठाकरेंवर टीका करत राहतात. पण चला, इतिहास आणि तारखांकडे पाहूया:

आनंद दिघे यांचा मृत्यू: २६ ऑगस्ट २००१

बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली: २७ नोव्हेंबर २००५

उध्दव ठाकरे पक्षप्रमुख झाले: २००३

एकनाथ शिंदेंची आमदारकी:

२००४

२००९

२०१४

२०१९

या सर्व वेळा त्यांना AB फॉर्म देणारे आणि मंत्री पद, संधी देणारे होते उध्दव बाळासाहेब ठाकरे.

शिंदेंच्या चिरंजीवांची राजकीय इनिंग – कोणामुळे?

प्रथम खासदार झाले: २०१४ – कल्याण

पुन्हा खासदार झाले: २०१९
या दोन्ही वेळा उध्दव ठाकरे यांनीच त्यांना संधी दिली.

सत्य काय सांगतं?

इतिहास आणि दस्तऐवज स्पष्ट सांगतात की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला राजकीय जन्म देणारे एकमेव व्यक्ती म्हणजे उध्दव ठाकरे.

एकनाथ शिंदेंनी कितीही खोटं चित्र रंगवलं, टीका केली, सत्तेसाठी पक्ष फोडला तरीही सत्य लपवता येत नाही.

शेवटचा निष्कर्ष:

शिवसेनेचा वारस हा फक्त बाळासाहेबांची विचारधारा, बाळासाहेबांचा मार्ग आणि त्यांचं निस्सीम कुटुंब – उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सोबत उभा ठाकलेला शिवसैनिक ठरतो.

शिंदेंनी कितीही नाटकं केली किती राजकीय बॅनरबाजी केली किती चित्रपट काढले तरी त्यांचा खरा राजकीय जन्मदाता एकच – उध्दव बाळासाहेब ठाकरे!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!