अमळनेरमध्ये “संघ गंगा के तीन भगीरथ” नाटकाची सादरीकरणाची जय्यत तयारी
अमळनेर : विक्की जाधव
सकल हिंदू समाज, अमळनेर यांच्या वतीने राधिका क्रिएशन, नागपूर प्रस्तुत “संघ गंगा के तीन भगीरथ” या बहुप्रतिक्षित नाटकाचे सादरीकरण गुरुवार, दि. २६ जून २०२५ रोजी सायं. ७.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे होणार आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले असून, मार्गदर्शक रविंद्र भुसारी आणि लेखक श्रीधर गाडगे आहेत. नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धती, विचारसरणी आणि तीन महान कार्यकर्त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
प्रवेशिकेचे दर ₹१००, ₹२०० आणि ₹५०० असून, त्यासाठी शहरातील विविध ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध आहेत
श्रीराम मेडिकल, पंतजली, पद्मवाणी कॉलेजजवळ,विजय शॉपी, आठवडे बाजार, बजरंग सुपर मार्केट, गळवाड रोड,कामल एप्सार, गुर्जर बाजार, अनिल मेडिकल, साने गुरुजी रोड,मानस मेडिकल्स, स्टेशन रोड दीपक सीनेटरी, गळवाड रोडज्या. एच. पाटील भवनगायत्री स्टोअर्स, सुभाष चौक
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक वक्ते, मान्यवर, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.