“अमळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यानी गिरवले योगाचे धडे”
अमळनेर : विक्की जाधव
जगभर साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमळनेर पोलीस ठाण्यातही अनोखी सकाळ पाहायला मिळाली. २१ जून रोजी सकाळी ७ वाजता पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी योगाच्या आसनांमधून शारीरिक आणि मानसिक संतुलन साधले.
योग शिक्षिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, गणेश पाटील, विनोद सोनवणे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, विनोद भोई, नरेश बडगुजर, राहुल पाटील, विजय भोई, सिद्धांत शिसोदे, संदीप धनगर, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतिभा पाटील यांनी सांगितले की, “पोलीसांसारख्या सतत तत्पर असणाऱ्या सेवेत नियमित योगासने केल्यास चपळता, एकाग्रता आणि तणावरहित जीवन सहज शक्य होते.” तर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी उपस्थितांना आवाहन करत सांगितले की, “दिवसभराच्या धकाधकीच्या कामातून आरोग्य टिकवायचे असेल, तर व्यायाम व योग हेच सर्वोत्तम मार्ग आहेत.”