पाडळसरे धरण प्रकरणावरून अमळनेरमध्ये वातावरण तापले; माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यावर वक्तव्यावर सवाल
अमळनेर : विक्की जाधव
पाडळसरे धरणाला नुकतीच गुंतवणूक मंडळाकडून (PIB) मान्यता मिळण्याच्या आधीच तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या धरणाच्या मुद्यावरून जनतेत स्पष्ट मतभिन्नता आणि संताप निर्माण झाला आहे. त्यातच माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार म्हणून असताना त्यांनी केलेल्या कामाचे पूर्तता हे विसरता येणार नाही परंतु
“पाडळसरे धरण माझं बाळ आहे, आणि माझा मुलगा कसा वाढतोय याची मी नक्की दखल घेणार,” असे विधान माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी केले. मात्र त्यांच्या या विधानावर आता जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्यावर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
डॉक्टर बी एस पाटील यांच्या संदर्भात मार्मिक सोबत बोलताना एका प्रतिष्ठित नागरिकाने बी एस आबा गेले वीस वर्षे आपण कुठे होतात?
आमदार म्हणून पराजित झाल्यानंतर जनतेच्या संपर्कात कितीदा आलात?
पंधरा वर्षे सत्ता भोगूनसुद्धा अमळनेर तालुक्यात कोणत्या विकासाची भर टाकली?
माजी आमदार म्हणून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचं 10 x 10 चं कार्यालय तरी आहे का?
शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आपण स्वतः कितीदा रस्त्यावर उतरलात, आंदोलन केलं?
पक्ष बदलून प्रतिष्ठा जपली, पण जनतेचं काय?
आज अमळनेरच्या रस्त्यांवर एकच चर्चा – “स्वतःचं नाव येण्यासाठी सगळं. पण तालुक्याच्या भविष्याकडं कोण पाहणार?”
“फक्त भाषणं देऊन धरणं होत नसतात, त्यासाठी जनतेचा विश्वास आणि झगडण्याची हिंमत लागते!”
या प्रश्नांतून जनतेच्या मनात साचलेला रोष आणि अपेक्षाभंग स्पष्टपणे जाणवतो. एका स्थानिक नागरिकाने भाष्य करताना म्हटलं, “जर खरोखर धरणाची काळजी असेल, तर स्वतः पुढाकार घेऊन मोठं जनआंदोलन उभं करा. दुसऱ्याच्या आंदोलनात भाषणं ठोकणं सोपं असतं, पण खऱ्या अर्थाने लढणं म्हणजे जबाबदारीचं काम असतं.”
पक्ष बदलून फक्त वैयक्तिक प्रतिष्ठा जपणाऱ्या नेतृत्वावर सामान्य जनता सहजासहजी विश्वास करत नसते
“पाडळसरे धरण होणार नाही तोपर्यंत मोठं जनआंदोलन उभारायला आपण तयार आहात का?” असा थेट प्रश्नही त्यानी उपस्थित केला आहे. तालुक्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा विश्वास हा नेतृत्वाकडून तुटलेला असून, धरणासारख्या गंभीर विषयावर सत्ताधाऱ्यांची आणि प्रतिनिधींची भूमिका आता चाचणीवर आली आहे.
PIB संदर्भातील मिळालेल्या माहितीचे वृत्तांकन लवकरच.. स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी अमळनेरात लावलेले बॅनर्सवाल्याची होणार नामुष्की..
नियमित वाचत रहा मार्मिक समाचार