RBI कडून रेपो रेटमध्ये कपात, कर्जाचा EMI होणार स्वस्त!
नवी दिल्ली/वर्षा चव्हाण
सामान्य कर्जदारांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या रेपो रेटमध्ये लक्षणीय कपात करत सर्वसामान्यांना महागाईच्या काळात दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून थेट 0.50 टक्क्यांनी घटवून 5.75 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा EMI लक्षणीय स्वरूपात कमी होणार आहे.
🔴गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची महत्त्वपूर्ण घोषणा
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानुसार, रेपो रेटसह SDF (Standing Deposit Facility) रेट देखील 5.75% वरून कमी करून 5.25 टक्क्यांवर आणण्यात आले आहेत. ही कपात महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आर्थिक गती वाढवण्यासाठी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🟢रेपो रेट कमी म्हणजे काय होतो परिणाम?
रेपो रेट हा तो दर आहे, ज्यावर रिझर्व्ह बँक देशातील व्यावसायिक बँकांना कर्ज देते. जेव्हा RBI रेपो रेट कमी करते, तेव्हा बँकांसाठी निधी उधार घेणं स्वस्त होतं आणि त्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांसह आधीच कर्ज घेतलेल्या लोकांचाही EMI कमी होतो.
🟣पुर्वीही झाली होती कपात
फेब्रुवारी आणि एप्रिल २०२५ मध्येही RBI ने २५-२५ बेसिस पॉइंट्सने रेपो रेटमध्ये कपात केली होती. आता पुन्हा एकदा ५० बेसिस पॉइंट्सने कपात झाल्यामुळे एकूणच कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
🟠सामान्य नागरिकांसाठी काय अर्थ?
1.गृहकर्ज स्वस्त होणार
2.वाहन कर्जावरचा EMI कमी
3.वैयक्तिक कर्ज घेणं होणार सोपं
4.नोकरदार वर्गाला मोठा फायदा
महागाईच्या काळात RBI चा हा निर्णय आर्थिक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बँकांकडून कर्जदरात कपात जाहीर होण्याची शक्यता आहे.