पिक नुकसान भरपाईत ‘कपात’चा फटका; शेतकऱ्यांच्या आशा मातीमोल..
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतानाही, राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेवर गंड बसणार आहे. मार्च २०२३ रोजीच्या निर्णयानुसार निश्चित भरपाई देण्याचे ठरवण्यात आले आहे, मात्र मदत केवळ तीन एकर (दोन हेक्टर) पर्यंतच मर्यादित राहणार आहे.
राज्य सरकारने नुकताच १ जानेवारी २०२४ च्या जीआरचा प्रभाव कमी करून मागील निर्णय अंमलात आणण्याचे ठरवले आहे. परिणामी, नुकसानभरपाईच्या रकमेचा आकडा लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. अनेक शेतकरी आता मोठ्या अपेक्षेने जीआरनुसार मदतीची वाट पाहत असतानाच, हा निर्णय शेतकऱ्यांच्या पोटात धस्स करणारा ठरला आहे.
काय आहे बदल ?
नुकसान प्रकार जुन्या जीआरनुसार भरपाई (१ जानेवारी २०२४) नव्या निर्णयानुसार भरपाई (२७ मार्च २०२३)
शिरायुक्त विक्रमी नुकसान ₹१३,५०० प्रति हेक्टर ₹६,८०० प्रति हेक्टर
शाश्वत पिकांचे नुकसान ₹१८,००० प्रति हेक्टर ₹१३,५०० प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांचे नुकसान ₹२२,००० प्रति हेक्टर ₹१८,००० प्रति हेक्टर
या निर्णयामुळे खरीप हंगामात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळणार नाही, आणि त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडणार आहे.