June 29, 2025 1:30 am

अमळनेरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती मोठ्याउत्साहात साजरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती मोठ्याउत्साहात साजरी..

 

अमळनेर : विक्की जाधव.

लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती यंदा देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील ताडेपुरा भागातील नागरिकांनी एक भव्य व सुबक प्रतिमा स्थापन करून या जयंतीला विशेष स्वरूप दिले असून या प्रतिमेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते धनराज धनगर व धनराज चिंचोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिमा पूजनाचा मान भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांना लाभला. या वेळी शहरातील ताडेपुरा परिसरातील समस्त धनगर समाजबांधवांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत अनुशासित आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करत, उपस्थितांनी त्यांच्या आदर्शांप्रती श्रद्धा व्यक्त केली.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!