विठ्ठल मंदिर प्रभागतुन युवा नेतृत्व श्री श्याम बोबडे ‘’Action mode’’ वर…
मी आज पदा वर जरी नसलो तरी मी माझा वतीने जेवढी प्रभागील कामे करता येईल तेवढे करेल- श्याम बोबडे
प्रतिनिधी विजय केळझरकर
विठ्ठल मंदिर प्रभागात अनेक दिग्गज नगरसेवक असून सुद्धा प्रभागाचा पाहिजे तो विकास झाल नाही अनेक नागरिक नगरसेवकांवर संतप्त असून नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. अशातच कुठलेही मोठे पद नसताना श्याम बोबडे प्रभागातील लोकांच्या घरी जाऊन रोज प्रभागात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे व त्यावर चंद्रपूर शहर महानगर पालिके च्या वतीने किव्वा स्वतःच आपल्या खर्चाने प्रत्येक समस्येचे निवारण करून आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. प्रभागातील बोरिंग हाथ पम्प, गटार, नाले सफाई, झाडं छटाइ, खांबा वरील लाइट्स असो किव्वा पिण्याच्या पाण्याचा समस्या असो प्रत्येक काम स्वतः उन्हा पावसात उभे राहून काम करून घेत आहे. श्याम बोबडे हे युवा नेतृत्व असून प्रभागाचे नेतृत्व करत आहे या आधी सुद्धा त्यांनी अनेक समाजकार्य केले आहेत. हे सर्व काम निःस्वार्थ सेवेने करत असून यात कुठलाही स्वार्थ नाही आहे फक्त ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी मला माझा कामगिरी बघून माझी मदत करा अशी विनंती श्याम बोबडे यांनी केले आहे.