June 28, 2025 9:10 pm

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त तक्रारवाडी येथे थाडेश्वर मंदिर परिसर स्वच्छता करत जयंती साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त तक्रारवाडी येथे थाडेश्वर मंदिर परिसर स्वच्छता करत जयंती साजरी

(निलेश गायकवाड)

हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या (300वी) त्रीशताब्दी जयंती निमित्त इंदापूर पश्चिम मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा प्रतिमेचे पूजन करून तक्रारवाडी ता.इंदापूर येथील थाडेश्वर मंदिर परिसर स्वच्छता केली व महादेवाचा अभिषेक व आरती करण्यात आली
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोक कल्याणकारी कार्याचा प्रचार आणि प्रसार यावेळी अनेक मान्यवरांनी केला
तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी बोलताना सांगितले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष पासून बूथ अध्यक्ष, कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वजण अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत या मध्ये निबंध स्पर्धा, मंदिर स्वच्छता करणे, अहिल्या मातेच्या कार्याला उजाळा देणे, वेशभूषा स्पर्धा अशा अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती वणवे,तालुका अध्यक्ष तेजस देवकाते,जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पानसरे, दीनानाथ मारणे,प्रवीण शहा,तानाजी मारकड,राजेंद्र जमदाडे, संदीप खुटाळे,विलास वाघ,भाऊसाहेब वाघ,बबनराव कुटे, ज्ञानेश्वर मारकड,राजेंद्र गोडसे,संजय सकुंडे, मुन्ना कोकरे,किरण पवार, किरण काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!