June 28, 2025 11:15 pm

वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अमळनेरात 29 रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अमळनेरात 29 रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रा.सचिन देवरे सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

 

अमळनेर : विक्की जाधव 

हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अमळनेरात दिनांक 29 मे रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडणार आहे.

तसेच पाचोरा येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.सचिन देवरे सर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे.अमळनेर तालुका राजपूत एकता मंचतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रम जि. एस.हायस्कुल,अमळनेर येथील आय एम ए हॉल मध्ये सायंकाळी 5 वाजेपासून होणार आहे.

सालाबादप्रमाणे शहरात महाराणा प्रताप जयंतीला भव्य शोभायात्रा काढण्यात येत असते.मात्र यावर्षी काश्मीर पेहलगाम घटनेत काही निरपराध भारतीय नागरिकांचा जीव गेल्याने व महाराणा प्रताप हे राष्ट्रीय पुरुष असल्याने यावर्षी त्यांच्या जयंतीला जल्लोष न करता विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या ४८५ वर्ष जन्मोत्सवात सर्व समाजातील हिंदू बांधव व महाराणा प्रताप प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्वर्णदीप राजपूत,कार्याध्यक्ष जयविर राजपूत व राजपूत एकता मंच अमळनेर तालुका व शहर यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!