ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी भारतीय जवानाचे अमळनेरात जंगी स्वागत…

अपनी भाषा में पढ़े! Translate

ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी भारतीय जवानाचे अमळनेरात जंगी स्वागत…

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेरचे सुपुत्र व भारतीय सेनादलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेले तसेच भारत पाक युद्ध सुरू झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन अनेक आतंकवाद्यांना कंठ स्थानी पाठवून आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शौर्य, वीरतेच्या परिचय दिला होता.

सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील ताडेपुरा भिम नगर भागातील वीर जवान विजय किरण संदानशिव हे भारतीय सेनादलातील महार बटालियन III या रेजिमेंट मधील जवान सुट्टीवर असताना सैन्य दलाकडून अचानक बोलवण्यात आले, जम्मू काश्मीर येथे परिस्थिती खूप नाजूक असताना, या वीर जवानांनी कुठलंही गोष्टीचा विचार न करता, वीरता, शौर्य जोरावर पाकिस्तान मधील अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवले, 10 मे रोजी यांच्या रेजिमेंटवर पाकिस्तानाकडून ड्रोन हल्ला करण्यात आला, त्यावेळी काही जवान जखमी झाले तर जवान विजय संदानशिव 25 मिटर लांब असल्यामुळे थोडक्यात बचावले, त्यानंतर त्यांच्या तुकडीने संपूर्ण ऑपरेशन सिंदूर यशस्वीरिता पार पाडले.

तसेच आपल्या अमळनेरचे सुपुत्र सुखरूप घरी आल्यावर अमळनेर येथील पंचशिल युवक मंडळतर्फे या वीर जवानाच्या भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंडळातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच अमळनेर पोलीस स्टेशन मधील DB पथकातील विनोद संदानशिव हे त्यांचे मोठे बंधू आहेत.अशा वीर जवानाचे संपूर्ण परिसरात अभिमानाने कौतुक केले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!