December 10, 2025 4:26 am

खुर्चीची खदखद! अमळनेरात ‘व्हीआयपी खुर्ची’चा महास्फोट – पक्षांतर्गत वादाला तोंड!

अपनी भाषा में पढ़े! Translate

खुर्चीची खदखद! अमळनेरात ‘व्हीआयपी खुर्ची’चा महास्फोट – पक्षांतर्गत वादाला तोंड!

 

अमळनेर : विक्की जाधव.

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभात ‘खुर्ची’चा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. 

 

“खुर्ची” या शब्दाला आज अक्षरशः स्फोटक राजकीय अर्थ प्राप्त झाला ! 

कार्यक्रमास बोलवले सर्वांना पण व्यासपीठावरील खुर्चीवर दिसले फक्त काही चेहरे – सौ. जयश्रीताई अनिल पाटील, आमदार अनिल पाटील आणि मंत्री बाबासाहेब पाटील. अन सहकारी बाकी सगळे? खालीच बसले!

ही दृश्यं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण ज्यांचं राजकीय वजन जास्त आहे, त्यांची प्रतिष्ठा मात्र खुर्चीविना हलली!

जिल्हा बँकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना बसायला खुर्चीच नव्हती! कां मुद्दामच दिली नाही?? 

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, “जिल्हाध्यक्षाची एवढीही किंमत नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

एवढंच नव्हे, नुकतीच विधानसभा निवडणुक लढवलेले उमेदवार डॉ. अनिल शिंदे, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पाटील, सदस्य सुषमा देसले – या सर्वांना खालीच स्थान!

हा ‘व्हीआयपी प्रोटोकॉल’ की ‘व्हीआयपी अपमान’?, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

 

संपूर्ण अमळनेरात आता चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे – “खुर्ची”!

आता ‘सत्ते’च्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी इतरांची खुर्ची काढून घेतली, तर हा संदेश नक्कीच अस्वस्थ करणारा आहे.

आता कार्यकर्त्यांत खदखद वाढत असून, अनेक पदाधिकारी या अपमानामुळे नाराज आहेत. आगामी राजकीय समीकरणांवर याचा खोल परिणाम होणार हे निश्चित.

एक छोटे खुर्ची प्रकरण, पण त्यातून उभं राहिलं आहे मोठं राजकीय वादळ!

या ‘खुर्ची वादावर’ सत्ताधाऱ्यांचं मौन अधिक बोलकं ठरतंय…

थोडक्यात. बाकी पुढे 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!