माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी पणदरे मधून या उमेदवाराला संधी मिळणार का…❓
.
बारामती (सह-संपादक संदिप आढाव)
.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संचालक पदाच्या उमेदवारी साठी राजेंद्र बापूराव जगताप यांनी पणदरे गटातून संचालक पदासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागणी केली आहे…
माळेगाव कारखान्यामध्ये अधिकारी ते एमडी पदापर्यंत 37 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, तसेच कामगारांचे व सभासदांचे प्रश्न याची उत्तम जाण , कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सर्व सभासदांशी वैयक्तिक संपर्क व कारखानातील विविध प्रकल्पांच्या उभारणीत मोलाचा सहभाग तसेच त्या प्रकल्पांमधून उच्चांकी उत्पादन घेण्याचा अनुभव , भविष्यात कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे होऊ घातलेले एक्सपान्शन या गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. माळेगाव कारखान्याच्या सभासदांमध्ये सर्वसामान्यांची कामे करणारा, मितभाषी व प्रश्नांची जाण असणारा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे, तेव्हा अनेक उमेदवारांनी मागणी केलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…