पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कुंभारगाव येथे संपन्न
प्रतिनिधी भगवान लोंढे
हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त मौजे. कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे. येथे सोमवार दिनांक 02/ 06/2025 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोक कल्याणकारी कार्याचा प्रचार ,आणि प्रसार करण्यात आला अध्यक्ष कु. आदित्य दत्तात्रय धुमाळ खजिनदार युवराज दामोदर धमाळ .यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणला . यावेळी गावातील सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ,उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन भिगवन पोलीस स्टेशनचे बीट आमलदार मिसाळ साहेब .गणेश धुमाळ. भाऊसाहेब धुमाळ. यांनी केले तसेच संपूर्ण गावातून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिगवण पोलीस स्टेशनने चोक बंदोबस्त ठेवला होत.