निम येथे तापी नदीत बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
अमळनेर – विक्की जाधव.
तालुक्यातील निम गावात २ जून रोजी दुपारी तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
चेतन धनराज पवार (वय ९) आणि मयुर उर्फ हरीश बाळू पाटील (वय १२) अशी मृत मुलांची नावे आहेत. गावात लग्न समारंभ असल्याने हे दोघे दुपारी लग्नात जेऊन तापी नदीकाठच्या दिशेने गेले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शोध घेत असताना चेतनचा मृतदेह नदीकाठी आढळून आला. याने गावांत खडळबळ उळाली त्याचे शव विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी आज सकाळी मयुरचाही मृतदेह नदीतून सापडला.
घटनेची माहिती मिळताच मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.