जनसामान्य घरातून पुढे आलेले नेतृत्व मा. सुरेश अर्जुन पाटील तालुका प्रमुख – शिवसेना (शिंदे गट),
अमळनेर : विक्की जाधव
सामान्य घरातून उगमलेले, पण असामान्य नेतृत्वाचे तेजस्वी उदाहरण!
आजचा दिवस एक विशेष ठरतो – कारण हा दिवस आहे त्या व्यक्तिमत्वाचा, जे आपल्या कार्याने, लोकसंपर्काने आणि सेवाभावाने संपूर्ण अमळनेर तालुक्याचे हृदय जिंकून गेले आहेत – ते म्हणजे मा. सुरेश अर्जुन पाटील साहेब.
सामाजिक जाणिवा असलेला राजकारणी
गोरगरिबांच्या प्रश्नांशी नेहमी एकरूप राहणारे, माऊली मित्रपरिवार अमळनेर तालुका या मंचाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रीय योगदान देणारे पाटील साहेब हे आजच्या नव्या पिढीला प्रेरणास्थान आहेत.
आदर्श गावाचा आदर्श सरपंच – सुंदरपट्टी
एक आदर्श गाव निर्माण करायचे असेल, तर नेतृत्व खऱ्या अर्थाने जनतेतून उगमले पाहिजे. सुरेश पाटलानी विकास, स्वच्छता, लोकसहभाग आणि पारदर्शक कारभार या गोष्टींना प्राधान्य देत सुंदरपट्टीला ‘आदर्श गाव’ या दर्जापर्यंत नेले.
नेहमी सामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व
तालुकाप्रमुख या जबाबदारीतून त्यांनी गावागावांमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न ऐकले, ते समजून घेतले आणि त्यावर तातडीने कार्यवाही केली. त्यांचा संवादकौशल्य, कार्यक्षमतेचा ठसा आणि सर्वसमावेशक वृत्ती हे त्यांचे बलस्थान आहे.
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
“मा. सुरेश अर्जुन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, यशस्वी आणि दीर्घायुषी जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. समाजासाठी तुमचे योगदान अशीच प्रेरणादायी वाटचाल करत राहो!”
माऊली मित्रपरिवार, अमळनेर.