डी.आर.कन्या शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम
अमळनेर : विक्की जाधव
येथील डी.आर.कन्या शाळेचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभाग नाशिक यांचे मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी.प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 चा ऑनलाईन निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. त्यात डी.आर.कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
परीक्षेत एकूण 257 विद्यार्थीनी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 252 विद्यार्थीनी उत्तीर्ण होऊन शाळेचा 98.05 टक्के निकाल लागला आहे. 90 टक्क्यांच्या वर मार्क मिळवणाऱ्या 14 विद्यार्थिनी आहेत. प्रथम श्रेणीत 190 विद्यार्थीनी, द्वितीय श्रेणीत 14 विद्यार्थीनी, तृतीय श्रेणीत 15 विद्यार्थीनी पास झाल्या आहेत. मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षिका श्रीमती. एस.पी.बाविस्कर, एस.एस. माळी ,आर.एस.सोनवणे, डी. एन.पालवे, इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका बी.एस.पाटील, पी.पी.जोशी, एस.बी.उपासनी,व्ही.जे. पाटील,एस.ई.पाटील मुख्य लिपिक जे. एस. भालेराव शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी विदयार्थीनीचे अभिनंदन केले आहे.
शाळेतून पहिल्या पाच विद्यार्थीनी
प्रथम आस्मा लतिफ पिंजारी
९५.२० टक्के, दुसरी पाटील दिशा गिरीष 94.20 टक्के तिसरी रितीका विश्वास पाटील ९२.६०टक्के,चवथी रूद्राणी स्वप्नील अमृतकार ९२.४० टक्के, पाचवी योगीणी अरूण चौधरी ९२.०० टक्के