अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रोत्सवात अभंगवाणीचा भक्तिमय अनुभव
अमळनेर : विक्की जाधव
काल दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी, सदगुरू संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थान, अमळनेर येथे वार्षिक यात्रोत्सवानिमित्त विशेष अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाशिक येथील युवा गायक श्री सागर कुलकर्णी यांनी सुरेल अभंग सादर करत रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवले.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावमय असून उपस्थित भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन अभंगवाणीचा आस्वाद घेतला.
सागर कुलकर्णी यांना उत्तम संगीत साथ लाभली:
तबला : संगीत कुलकर्णी व श्रीपाद शिरवळकर. संवादिनी : अभिजित भटजिरे. कीबोर्ड : केतन जोशी. ताल वाद्य : राहुल हिंगे व अतुल
या सर्व कलाकारांनी समर्पक व सुसंवादित साथ देत कार्यक्रम अधिक बहारदार केला