June 29, 2025 7:29 pm

संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त मोफत सुपर स्पेशालिटी रोगनिदान शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त मोफत सुपर स्पेशालिटी रोगनिदान शिबिर

 

अमळनेर : विक्की जाधव

सद्गुरु संत सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे, तसेच जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ११ मे रविवार रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत अमळनेर येथील वाढी संस्थानात मोफत सुपर स्पेशालिटी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संत सखाराम महाराज पुण्यतिथीच्या औचित्याने आयोजित या शिबिरात शेकडो रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला व उपचार मोफत मिळणार आहेत. ग्रामीण आणि शहरातील गरीब, गरजू नागरिक तसेच यात्रेकरूंसाठी हे शिबिर वरदान ठरणार आहे.

उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा – “एकाच छताखाली आरोग्याची संपूर्ण तपासणी”

या शिबिरात खालील आजारांवर तपासणी व सल्ला दिला जाणार आहे:

मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट विकार पित्ताशयाचे खडे, स्वादुपिंड व छोट्या गाठी मूळव्याध, भगंदर, हायड्रोसील, अंडाशय विकार हृदयरोग, अँजिओप्लास्टी व बायपास सल्ला कर्करोग, बालरोग व मेंदू/मणक्याच्या शस्त्रक्रिया नाक-कान-घसा, नेत्ररोग, गर्भपिशवी व अस्थीविकार मानसिक आरोग्य तपासणी व सल्ला मोफत ECG आणि कार्डियोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि शस्त्रक्रिया मार्गदर्शन. रुग्णांनी मूळ आधारकार्ड आणि रेशनकार्ड हे सोबत आणावे:

संतसेवेच्या माध्यमातून आरोग्याची मशाल

या उपक्रमाचा उद्देश केवळ वैद्यकीय सेवा पुरवणे नाही, तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्त्व प्रत्यक्षात आणणे आहे. संत सखाराम महाराज यांच्या पुण्यस्मरणाने प्रेरित होऊन, हे शिबिर सामाजिक बांधिलकीची एक उजळ किनार ठरेल.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!