June 28, 2025 7:37 pm

गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत पालिकेच्या कारभारावर संतप्त नाराजी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत पालिकेच्या कारभारावर संतप्त नाराजी..

 

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत असून, नागरिक भीषण उन्हात पाण्याच्या थेंबासाठी वणवण फिरत आहेत. कर वसुलीमध्ये नेहमी आघाडीवर असलेल्या नगरपरिषदेकडून आवश्यक सुख-सुविधांमध्ये मात्र फार मोठे अपयश दिसत आहे.

घर खरेदी करतांय मुंदडा बिल्डर्स आहेचं की, मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचं..

मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मुंदडा नगर, लक्ष्मीनगर व इतर भागात जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा पूर्ण ठप्प झाला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म असून, दरमहा पाणीकर भरण्यासाठी मात्र दंडासकट सक्ती केली जाते.

उन्हाळ्याच्या झळा वाढलेल्या असताना, पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असूनही प्रशासनाचा ढिसाळपणा अक्षम्य आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेतील ही कुचराई म्हणजे नागरी सेवेतील गंभीर त्रुटी असून, मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग यांची थेट जबाबदारी आहे, असे निवेदनात ठणकावून सांगण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये लोकवर्गणी आकारली जाणार नाही, असे पालिकेने आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या बिलांमध्ये ती आकारणी दिसत असल्याने पालिकेने दिलेले आश्वासन पायदळी तुडवले आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप आहे.

उपमुख्याधिकारी श्री. चव्हाण यांनी हे निवेदन स्वीकारले आहे.

दरम्यान, आगामी संत सखाराम महाराज यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात होणार असताना, पालिकेचे पाण्याचे नियोजन ठप्प अवस्थेत आहे. लोकांच्या डोळ्यांपुढे प्रश्न उभा आहे यात्रा उत्सवात पाणीपुरवठा कसा होणार?

जिल्हास्तरावर पालिकेच्या ‘चांगल्या कर वसुली’चे कौतुक होत असले तरी, वस्तुस्थिती अशी आहे की, अमळनेरची जनता भर उन्हात पाण्याविना मरणयातना भोगत आहे.

थेटपणे सांगायचं झालं तर —

मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि पाणीपुरवठा इंजिनिअर प्रवीण कुमार बैसाणे यांनी अमळनेरकरांना पाण्याविना तडफडत ठेवायचं ठरवलंय का? असा संतप्त सवाल आज रस्त्यावरच्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर आहे!

पालिका प्रशासनासाठी ही स्थिती लाजिरवाणी असून, तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे समजते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!