June 29, 2025 3:28 pm

करमाळा एस.टी. स्थानक बनले अवैध वाहनांचे वाहन तळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन एस.टी. स्थानकाला कोटयावधीचे अर्थसहाय्य करीत असूनही करमाळा एस.टी. स्थानकाला मात्र उकीरडयाचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे तर अवैध वाहनांचे वाहन तळ म्हणून काही दिवसांत करमाळा एस.टी. स्थानकाला पुरस्कार मिळाला तर वावगे ठरणार नाही.

सदर स्थानकात डेपो मॅनेजर यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असून शौचालयामध्ये दुर्गंधी पसरलेली दिसून येते तर हिरकणी कक्ष, पाण्याची व्यवस्था याबाबत प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. तसेच स्थानक परिसरात मोकाट जनावरांचा, कुत्र्यांचा सर्रास वावर पहायला मिळतो. मोकाट जनावरांमुळे प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण होवू शकतो याची जाणीव बहुदा डेपो मॅनेजर यांना असूनही ते जाणीवूपर्वक या बाबींकडे डोळेझाक करीत आहेत अशी कुजबूज प्रवाशांमध्ये ऐकायला मिळत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!