आदिवासीबहुल भागात रंधे कुटुंबाचे कार्य कौतुकास्पद
-डॉ.राहुल भामरे

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) बोराडी सारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात लिलाई हाॅस्पिटलच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार सुविधा रुग्णांना मिळत आहेत.वैद्यकीय सेवासुविधांबाबत व अशा शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना गावातच तपासणी, उपचार उपलब्ध करुन दिले आहेत,रंधे कुटुंबाचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन धुळे येथील कर्करोगतज्ञ डाॅ.राहुल भामरे यांनी केले.
किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या मा.विश्वस्त लिलाताई विश्वासराव रंधे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव रणधीर आयुर्वेद महाविद्यालयातील लिलाई हॉस्पिटलमध्ये भव्य रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न झाले.

यावेळेस झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या.प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे होते तर,संस्थेचे सचिव निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे,आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, विश्वस्त रोहित रंधे,सरपंच सुकदेव भिल,कर्करोग तज्ञ डॉ.राहुल भामरे,हृदयविकार तज्ञ डॉ.मोहित अग्रवाल,मेंदुविकार तज्ञ डॉ.सागर पाटील,किडनीविकार तज्ञ डाॅ.सुदिप पाटील,अस्थिरोग तज्ञ शैलेष शिंदे,शल्यविभागाचे डाॅ.कमल अग्रवाल,डाॅ.गुप्तेश्वर सोनवणे,धुळे-नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सिमा रंधे,प्राचार्या सारीका रंधे,ग्रा.पं.सदस्या विद्या रंधे,संचालक हर्षाली रंधे,रोहीणी रंधे,गौरी रंधे,
संस्थेचे सदस्य शामकांत पाटील,धुळे-नंदुरबार ग.स बँकेचे संचालक शशांक रंधे,प्राचार्य एस.एन.पटेल,उपप्राचार्य कल्पेशकुमार वाघ,डाॅ.दिलिप पाटील,दिलिप पाटील,प्रमोद पवार,राज निकम,विशाल पावरा,किशोर भदाणे,रवींद्र शिंदे,भागवत पवार,राजु सुर्यवंशी, उद्योजक हर्षवर्धन रंधे,संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील,के.डी.बच्छाव,भैय्या माळी,सिताराम माळी,इ.उपस्थित होते.

शिबीरात गरजु रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.शिबीरात बोराडी परिसरातील बुडकी,न्युबोराडी,उमर्दा,धाबापाडा अशा दुर्गम भागातील 1203 रुग्णांची वैयक्तिक तपासणी करण्यात आली.त्यात 263 गंभीर आजाराचे रुग्ण आढळून आले.परिसरातील गरजु रुग्णांची मोफत तपासणी व्हावी म्हणून दोन आठवड्यापासून लिलाई हाॅस्पिटलच्या पथकाने खेडोपाडी,घरोघरी जाऊन रुग्णांची नोंदणी केली होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डाॅ.राजेश गिरी,शिबीर प्रमुख डाॅ.गुप्तेश्वर सोनवणे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन डाॅ.जया जाने यांनी केले.
