December 10, 2025 4:35 am

शिरपूर परीट महिला मंडळाची कार्यकारिणी झाली जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

 

शिरपूर परीट महिला मंडळाची कार्यकारिणी झाली जाहीर

दीपाली सूर्यवंशींची अध्यक्षपदी निवड

 

शिरपूर : महाराष्ट्र परीट सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षा सीमा तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर शहर परीट महिला मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. यात अध्यक्षपदी दीपाली सुनील सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

समाजातील ज्येष्ठ नेत्या तथा किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशा विजयराव रंधे, सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. रजनी नकुल लुंगसे, प्राचार्या सारिका निशांत रंधे, मीराबाई सूर्यवंशी, प्रमिला सूर्यवंशी, विशाखा कुंवर उपस्थित होते. सुरुवातीला लोकमततर्फे वुमन अॅचिव्हर्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सीमा रंधे यांच्या समाजाच्या महिला मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर समाजातील महिलांसाठी वर्षभर कार्यक्रम राबविण्याचे ठरले.

नूतन कार्यवाहिनी..

अध्यक्षपदी दीपाली सूर्यवंशी, उपाध्यक्षा सुनीता जाधव, कोषाध्यक्षा पूजाल लुंगसे तर सदस्यपदी मनीषा भिलाणे, सविता बेडिस्कर, शीतल सैंदाणे, सुरेखा बेडीस्कर, सविता वाघ, विशाखा कापडे, आरती येशी, संगीता सूर्यवंशी, अलका विजय येशी, मनीषा प्रदीप हरळे, कल्पना विजय येशी, रूपाली किरण वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा सुरेखा बेडिस्कर यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा दीपाली सूर्यवंशी यांच्याकडे अध्यक्षपदाचे सूत्रे दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!