के व्ही पी एस फार्मसी शिरपूर येथे जन औषधी परियोजना अंतर्गत पदयात्रा…..
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) भारतीय जन औषधी परियोजना अंतर्गत 1 ते 7 मार्च रोजी पर्यंत जन औषधी सप्ताह संपुर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने किसान विद्या प्रसारक संस्थेचे महाराणी अहिल्याबाई होळकर कॉलेज ऑफ फार्मसी शिरपूर येथे जनजागृती रॅली काढण्यात आली .
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश पवार, धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सचिव शांतीलाल पाटील, शिरपूरतालुका अध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष तुषार जैन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट कार्यकारणी सदस्य संदीप संगवी, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली .
या रॅली चे उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश पवार यांनी त्यांच्या मनोगतात आदिवासी बहुल बोराडी भागात किसान विद्या प्रसारक संस्थेचे लीलाई हॉस्पिटल बोराडी येथे प्रधानमंत्री जण औषधी केंद्र सुरू केले गेले आहे की जेणेकरूनआदिवासी बांधवांसाठी स्वस्त औषधे त्या केंद्रात उपलब्ध आहेत ,
या प्रसंगी तुषार जैन म्हणाले की, आजच्या जनजागृती पद यात्रेचे प्रसारण फार्मासिस्ट विद्यार्थ्यांच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होत आहे असे प्रतिपादन केले तसेच याप्रसंगी “जन औषधे स्वस्त सुद्धा” आणि “चांगली सुद्धा ” या घोषवाक्यासह संपूर्ण शिरपूर शहरांमध्ये पदयात्रा आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या जनजागृती बद्दल धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कि वि प्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे ,सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक रोहीत रंधे , शामकांत पाटील, विश्वस्त , संजय गुजर , कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक रंधे, यांनी कौतुक केले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले तर सूत्रसंचालन प्रा हर्षल मिस्त्री यांनी केले.