March 3, 2025 9:41 am

ठाण्याचा विचार मंथन दौरा म्हणजे दुष्काळग्रस्त भागाची हवाई पाहणी !

अपनी भाषा में पढ़े! Translate

ठाण्याचा विचार मंथन दौरा म्हणजे
दुष्काळग्रस्त भागाची हवाई पाहणी !
शिवसेनेचे नेते ठाण्याचा दौरा करून विचार मंथन करणार आहेत,अशी बातमी वाचली. पण खरं सांगू “आत्ता वेळ निघून गेली आहे.” होय दिघे साहेबांची व बाळासाहेबांच्या ठाण्याची पार वाट लागली आहे. एकनाथ शिंदेंनी जी गद्दारी केली त्यानंतर शिंदेंच्या दडपशाहीला व मुजोरपणाला वेळीच दडपले गेले असते तर ही वेळ आली नसती. दिघे साहेबांच्या प्राणप्रिय आनंद आश्रमावर शिंदेंनी कब्जा केला व त्यास आपण पायबंद घालू शकलो नाही,आनंद आश्रम शिंदेंच्या जबड्यातून वाचवू शकलो नाही, तिथेच आपण अपयशाचा पाया रचला.
अनेक निष्ठावंत शिवसैनिकांवर अत्याचार झाले पण आम्ही मुकदर्शक बनून राहीलो. अनेक शिवसैनिक फितूर झाले त्यांना आपण रोखू शकलो नाही. दिघे साहेबांचे खासमखास असलेले कित्येक लोक शिंदेंकडे गेले ते काही सर्वच गद्दार नव्हते.त्यांचा योग्य तो मान-सन्मान राखला गेला नाही म्हणून अनेकजण गेले. आपण फक्त प्रस्थापित सुभेदारांनाच गोंजारत राहीलो. दिघे कार्ड कॅश करण्यासाठी टेंभी नाका तेथील नवरात्रवर वर्चस्व टिकवू शकलो नाही. लोकसभा व त्या पाठोपाठ विधानसभा निवडणूकीत धोबीपछाड होऊनही आत्मपरिक्षण करण्याऐवजी पराभवांना मुलामा देऊन समर्थन करून आपलीच पाठ थोपटून घेऊ लागलो. ठाण्याचा जिल्हा प्रमुख ठाण्याच्या वेशी बाहेर पडला नाही. नेते, उप नेते,संपर्क नेते, प्रवक्ते प्रस्थापितांची भलामण करू लागले, महिला आघाडीला भगदाड पडले तरी कोणाला जाग आली नाही. लोकसभा असो कि विधानसभा निवडणूक पराभवाचे चिंतन करण्या
ऐवजी शिंदेंच्या कपटनितीवर टिका करून आपले कच्चे दुवे झाकू लागलो.
मातोश्रीवर ” पोपट मेला आहे” हे सांगण्याचे धाडस कोणी दाखवू शकले नाही. पोपट बोलत नाही,पोपटाचे पंख हलत नाहीत, पोपटाने डोळे मिटले आहेत हे असत्य सांगून राजाला गुमराह ( दिशाभूल ) करण्यात आपल्या पदाचे कसब पणाला लावत राहीले.
लोकसभा व विधानसभेत पराभव झालेले आत्ता महापालिका निवडणूकीत आपल्या कुटुंबकबिल्यांसह उतरवू पाहतील. वस्तुतः महापालिकेच्या निवडणूकीत प्रभाग निहाय सक्षम उमेदवारांचा दुष्काळ आहे.जे प्रबळ उमेदवार व माजी नगरसेवक होते ते सर्व शिंदेंनी आपलेसे केले. त्यांनी प्रवेशासाठी वर्षा पासून ठाण्याची सर्व दारं सताड उघडी ठेवली आणि आम्ही- ज्यांना जायचे त्यांनी जा ! मी अडवणार नाही म्हणत सर्वांना रान मोकळे करून दिले.
आत्ता मैदान साफ झाले आहे,हत्यारं म्यान झालेली आहेत. समोर समृद्ध संपन्न व बलाढ्य सेना आहे.आम्ही निशस्त्र, अवसान गळालेल्या सैन्यानिशी कसे लढणार ? आपण समोरच्याला जश्यास तसे उत्तर दिले असते, संयमाऐवजी संघर्ष केला असता तर ही वेळ आली नसती.
मुंब्रा येथील शाखेस भेट देण्यासाठी खुद्द पक्षप्रमुख येऊन सुद्धा त्यांना अडवण्यात प्रतिपक्ष यशस्वी झाला तरी देखील विरोधात एक दगड भिरकावला गेला नाही, पक्ष प्रमुखांच्या अपमानाने संतप्त होऊन दंगल उसळण्या ऐवजी आम्ही आलिशान “टिपटॉप प्लाझा” हॉटेलात पत्रकार परिषद घेऊन वेळ मारून नेली. यामुळेच शिंदेसेनेची हिंमत वाढली. एकेकाळी फक्त बाळासाहेबांचा एकेरी उल्लेख केला म्हणून तुरूंगात कैदी असलेल्या विश्वनाथ खटाटे (बुवा) यांनी जेलरच्या कानफटीत मारली होती. सावरकर,भगतसिंग, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारे आम्ही संयमी ( कि गांडू ) का झालो ? कोणी केले आम्हाला गांडू ? ठाणे हा जिल्हा आपल्या दृष्टीने गेल्यातच जमा आहे ! अशी धारणा असलेल्या “त्या” नेत्याला विचारावे, मंथन करून काही पदरात पडणार की; दुष्काळग्रस्त भागाचा हेलिकॉप्टरने केलेला पाहणी दौरा ठरेल ?
आत्ता ठाण्यात विचार मंथन दौरा करणार म्हणजे काय करणार ? त्याच त्याच स्थानिक प्रस्थापितांना भेटणार ! ते पोपट मेला नाही ! हे खुबीने सांगणार व ते दौरा करणा-या नेत्यांना “पटवून” देणार आणि तेच मातोश्रीवर रिपोर्टिंग करणार- पोपट मेलेला नाही.
होय पोपट मेला आहे ! हे निक्षून सांगणा-यांना दौरेबाज नेत विचारणार नाही, प्रस्थापित त्यांना जवळपासही फिरकू देणार नाहीत.विचार मंथनाने निघणारे विष पिणारा नीळकंठ महादेव येथे कोणी नाही. येथे बडवेच जास्त माजलेत व मातोश्रीवर त्यांचीच चलती असेल तर लाख वेळा मंथन करा अमृत बाहेर पडूच शकणार नाही.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!