March 3, 2025 7:02 am

भुरट्यांनो, पुस्तकं जाळा, माणसं जाळा, सगळ्यांचीच राख करा !

अपनी भाषा में पढ़े! Translate

भुरट्यांनो, पुस्तकं जाळा, माणसं जाळा, सगळ्यांचीच राख करा !

दत्तकुमार खंडागळे , मो. 9561551006

परवा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरच्या कुणी प्रशांत कोरटकर नावाच्या बांडगुळाने धमकी दिली आहे. प्रशांत कोरटकर नावाचा हरामखोर इंद्रजीत सावंत सरांना धमकी देताना छत्रपती शिवरायांच्याबद्दल अतीशय हलकट प्रवृत्तीने बोलला आहे. तो जे बोलला आहे ते ऐकताना कानात कुणीतर शिसे ओतत आहे असं वाटतय. तो हरामी कोरटकर छत्रपती शिवरायांना एकेरी बोलत तुमचा राजा पळून गेला असे म्हणतो. त्याने बोलताना जेम्स लेनच्या हरामखोरीचाही उल्लेख केलाय. महाराजांचे बॉयलॉजिकल फादर कोण आहेत ? ते सांगा म्हणत माता जिजाऊंच्या चारित्र्यावर चिखलफेक करतोय. या अशा प्रसंगातून जेम्स लेन विदेशी होता पण त्याच्या मागे या देशी औलादीच आहेत. त्यांनीच ही सगळी घाण पेरली आहे. याचा प्रत्यय येतो. चित्रलेखाचे संपादक द्नानेश महाराव यांनी त्यांच्या अग्रलेखातून या विदेशी तोंडावळ्यामागे देशी मस्तक असल्याचे त्यावेळी ठासून मांडले होते. कोरटकर नावाच्या हरामखोराने मस्तवालपणे त्याचा उल्लेख करत ते विष जेम्स लेनच्या नव्हे तर या नराधमांच्याच मस्तकातले आहे याचा पुरावा दिला आहे. ही जातीयवादी गँग इतकी मस्तावली आहे की त्यांना कशाचेच भान राहिले नाही. त्यांना केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेचा प्रचंड माज आलाय. मलाही परवा संभाजी भिडेंच्या काही धारकड्यांनी धमकी देत तुझे पुस्तक जाळ, चुलीत घाल, बाहेर काढलस तर बघ, पोरं पाठवून देतो ! अशा पध्दतीची धमकी दिली आहे. ९०६७३६४५७३ या नंबरवरून सदरच्या बांडगुळाने मलाही घरी येवून मारण्याची, पोरं पाठवून देण्याची धमकी देत पुस्तकं जाळून टाकण्याची तंबी दिली आहे. या भुरट्यांना घाबरून आम्ही लिहायच व बोलायच थांबणार नाही. त्यांनी कितीही बुड आपटले, जीव जरी घेतला तरी थांबणे शक्य नाही. याची नोंद या भामट्यांनी घ्यावी. मग ते इंद्रजीत सावंत असतील किंवा अन्य कुणी. वज्रधारीचा आवाज बंद होणे तर कधीच शक्य नाही. मग या लोकांनी कितीही ताकद लावावी. सत्तेचे साखळदंड घालावेत, नाहीतर गोळ्या घालाव्यात. सत्य सांगण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. याची नोंद या बावळ्यांनी घ्यावी. या लोकांशी वाद नाहीच, ही बहूजन आय-बापांचीच वाट चुकलेली लेकरं आहेत. त्यांच्या मेंदूत जे जातीयवादी किडे वळवळत आहेत त्याचा संबंध आहे. हे किडे महाराष्ट्रधर्माच्या, शिवरायांच्या विचाराला पोषक नाहीत. ही घाण महाराष्ट्र धर्माला मोडीत काढणारी आहे.

हे सगळं भयंकर आहे. महाराष्ट्रात जे सुरू आहे ते महाराष्ट्राचा तालिबान झाल्याचे दर्शवणारे आहे. भविष्यात या सगळ्या गोष्टीचे भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत. हे नाही थांबलं तर खुप मोठ्या अनर्थाला सामोर जावं लागेल. या लोकांनी एकदा अवघ्या देशाचीच वाट लावून टाकावी. सत्य सांगणारी पुस्तकं जाळावीत, माणसं जाळावीत, सगळ्या-सगळ्याची राख करावी. अवघ्या देशाला शेंडी लावा. महाराष्ट्राचे, देशाचे वाटोळे करा. समृध्द वारसा असलेला भारत जातीयवादाच्या आगीत जाळून राख करा. इतकं केल्यावर तरी तुमचं मन भरणार आहे का ? ‘ब्राम्हण्य’ वादाच्या मुळव्याधीने ग्रासलेले हे काही लोक स्वत:सोबत राज्याचीही वाट लावणार आहेत. कोरटकर, राहूल सोलापुरकरसारखी बांडगुळ जे बडबडत आहेत ते त्यांच्यासह त्यांच्या समाजाला अनर्थाकडे घेवून जाणारं आहे. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि अजेंड्यात जो जातीयवादाचा कंड आहे तो त्यांचीही माती करेल. या देशात ब्राम्हण समाजातल्या अनेकांचे मौल्यवान योगदान आहे पण पेशवाई मानसिकतेने ग्रस्त असलेले काही अडाणचोट सगळ्या जातीलाच अडचणीत आणत आहेत. ही टिनपाट बांडगुळं सुर्याला गिळण्याची स्वप्ने पाहत आहेत. पण हा शिवसुर्य त्यांचे बुड जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. भामटा सोलापुरकर किंवा कोरटकर हे दृष्य रूपातले किडे आहेत. कोरटकर किंवा सोलापुरकर जे बोलत आहेत ते एका षढयंत्राचा भाग असावा असे वाटते आहे. या भडव्यांच्या मागे त्याच निच मनोवृत्तीचे हजारो आहेत. त्यांना वाटतय की पुन्हा पेशवाई आलीय, सर्वत्र आमचं राज्य आलय, आमचंच सरकार आलय. म्हणूनच कोरटकर नावाचा भुरटा मस्तवालपणे शिवरायांचा अवमान करत होता. सध्या देशात दिसणारे चित्र तसे असेलही पण ज्या दिवशी शिवभक्त आणि मराठी माणूस पेटून उठेल तेव्हा या भडव्यांची अवस्था फार वाईट होईल. औरंगजेबाचे राज्य अवघ्या भारत वर्षात होते, पण मावळ्यांनी त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडलाच. औरंग्याकडे तुलनेत सैन्यही खुप होते. पण त्याचेही राज्य नष्ट झाले. मग हे कोण लागून गेले लाठी-काठीवाले नटरंग ? कोरटकर, सोलापुरकर सारख्या बांडगुळांनी याचे भान ठेवावे. भाजपाचेच आणि ‘ब्राम्हण’ वादाने पछाडलेलेच लोक शिवरायांचा अवमान सातत्याने का करत आहेत ? या मागे त्यांचे काय कारस्थान आहे ? ते बहूजन बावळ्यांनी समजून घ्यावे. जातीयवादी ‘ब्राम्हण्य’ ग्रस्ताने पछाडलेल्या काही भटांच्या नादाला लागून त्यांची विष्ठा प्रसाद म्हणून खाणा-या बहूजन बावळ्यांनी आपला खरा बाप कोण आहे ते ओळखावे ? ज्यांना आपला बाप कोण ? आपला इतिहास काय ? याचे भान रहात नाही, स्मरण होत नाही त्यांना कुणी वाचवू शकत नाही. हे बहूजन बावळे म्हणजे पंचतंत्रातल्या बेडकाच्या औलादीचे आहेत. स्वत:च्या सत्तेसाठी, मान-सन्मानासाठी जातीचाच शत्रू असलेल्या सर्पाला विहिरीत घेवून जाणारा बेडूक आणि हे बावळे एकाच लायकीचे आहेत. मुर्ख बेडकामुळे सोकावलेला साप सर्वांनाच गिळंकृत करतो. विहिरीत घेवून जाणा-या बेडकाचीही पिल्ली तो गट्टम करतो. बावळ्या बेडकाच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ गेलेली असते. संघवाल्यांच्या मांड्या चोळणा-यांनी याचे भान ठेवावे. पण सत्तेसाठी, पैशासाठी आईला आई आणि बापाला बाप न म्हणण्याचा कृतघ्नपणा करणा-यांचा पहिला बळी जाणार आहे. हा सोकावलेला सर्प त्यांनाही सोडणार नाही. ‘ब्राम्हण्य’ वादी सत्तेच्या स्तनाला चिकटलेल्या गोचिडांना यातून कुणी वाचणार नाहीत. त्यांचीही अवस्था पंचतंत्रातल्या बेडकासारखीच होणार आहे.

ज्या समाजाला हिंसेची, इतरांच्या रक्ताची तहान लागते, ज्या समाजाला विद्वेषाची कावीळ होते, जो समाज सुडाने पेटतो, बदल्याच्या भावनेने चरफडतो तो समाज स्वत:च विध्वंसाची वाट चालतो. ज्या समाजाला सृजनतेची, रचनात्मकतेची, प्रेमाची घृणा वाटते असा समाज इतिहासाच्या पानावरही उरत नाही. तो स्वत: नष्ट होतोच पण त्यांच्या सोबत गेलेल्या इतरांचेही वाटोळे करतो. आजवरचा जगाचा इतिहास याला साक्षी आहे. सध्या महाराष्ट्राची वाटचाल त्याच दिशेने आहे. ‘ब्राम्हण्य’ वादाच्या जातीयवादी गंडाने चवताळलेले काही पेशवाई किडे स्वत:ची वाट लावून घेणारच पण त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचाही वाट लावणार आहेत. सध्या ते ज्या पध्दतीने आक्रमक झालेत, माजलेत ते पाहता त्यांचा अंत असाच होणार. हे दांडे गोतास काळ ठरणार आहेत. वर्ण वर्चस्ववादाच्या विकृतीने आणि सुडाने पेटलेले हे पेशवाई किडे स्वत:सोबत आपल्या संपुर्ण बांधवांच्या विणाशाचे कारण ठरू नयेत. प्रारंभी सत्तेच्या जोरावर हे लोक इतरांच्यावर अत्याचार करतील. झुंडशाही करतील, दादागिरी करतील पण कधीतर सुप्तावस्थेत असलेला तमाम समाज जागा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा गवताला भाले फुटतील. शिवराय आणि संभाजी राजांच्या, महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या गुणवत्तेचे बीज नक्की उगवून येईल. या माणसांच्या विचारातून नक्कीच क्रांतीची ठिणगी जन्माला येईल. तोवर भुरट्यानो तुम्ही माजून घ्या. मस्तवालपणे उन्मादाने बेदरकार व्हा. तोवर सगळं जाळा. पुस्तकं जाळा, माणसं जाळा. पण तीच सुडाची आग तुमचीही एक दिवस राख करेल याचे भान ठेवा.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!