शिरवलीत निरा नदीकाठी आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…
.
बारामती ( सह-संपादक – संदिप आढाव)
.
बारामती तालुक्यातील शिरवली येथे निरा नदीकाठी एका ५०-५५ वर्षांच्या इसमाचा मृतदेह आढळला असून सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी केले आहे.
शिरवली या ठिकाणी निरा नदी काठी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची खबर पोलिस पाटील निखिल घनवट यांनी माळेगाव पोलिस ठाण्यास दिली.सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक अमोल खटावकर, हवालदार जिवन डोंगरे, कॉन्स्टेबल अमोल कोकरे यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.
सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी सिल्व्हर जुबिली हॉस्पिटल बारामती येथे करण्यात आली.सदर घटनेचा तपास हवालदार जिवन डोंगरे करीत आहेत.