शिव फाउंडेशन ने भागवली वन्य जीवांची तहान;अकोले येथे टँकर द्वारे पाणी सोडण्यात आले…
(निलेश गायकवाड)
शिव फाउंडेशन ही एक सामाजिक संघटना आहे. यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उपक्रम गरजूपर्यंत राबविण्याचे काम करत असते. शिव फाउंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही देखील वन्यजीवांना उन्हाळ्याच्या पाण्याची टंचाई भासत असते हीच टंचाई व हीच तहान लक्षात घेऊन अकोले येथील कृत्रिम वन क्षेत्रात पानवट्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी या सदर आयोजन करण्यात आले होते.
उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते. कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज शिव फाउंडेशन ने पुढाकार घेतला.
वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने फक्त माणसानेच हवालदिल होत नसून याचा फटका प्राणी व पक्षांनाही बसत असतो आणि याचा परिणाम पक्षांच्या जीवनमानावर गंभीर होत असून वेळेस पाणी न मिळाल्याने अनेक प्राणी मृत्युमुखी पडत आहे.दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या जळावाडू लागल्या की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.
या कार्यक्रम प्रसंगी शिव फाउंडेशन अध्यक्ष संपत बंडगर, संजय खाडे, संतोष सवाणे, किरण रायसोनी, योगेश चव्हाण, केशव भापकर, अल्ताफ शेख,पत्रकार निलेश गायकवाड, संजय शिंदे,वन परिक्षेत्र इंदापूर अजित सूर्यवंशी,वनरक्षक संध्या कांबळे,कर्मचारी अक्षय खोमणे आदिजन उपस्थित होते.