इंदापूर तालुक्यातील हजारो महिलांना लाडक्या बहिण योजनेतून अपात्र करण्यात आले;कुठं गेला त्यांचा लाडका भाऊ?
तालुक्यातील महिलांना आपली फसवणूक झाली असे वाटू लागले…
(निलेश गायकवाड)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. सरसकट सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यात धडाधड पैसे आले. महायुती सरकार पुन्हा सत्तेत दाखल झाले. त्यानंतर या योजनेवरून गोंधळ सुरू झाला. या योजनेत निकषाचे, नियमाची रेषा आखण्यात आली. इंदापूर तालुक्यातील हजारो महिलांची नावं यादीतून कमी करण्यात आली.त्यावरून महिला संतापले आहेत. या बनवेगिरीविरोधात लाडक्या भाऊ म्ह्णून घेण्याऱ्या नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हजारो महिलांची नावे वगळण्यात आली असून अजून नावे वगळण्याचे काम जोमात सुरु..
महाराष्ट्रात विधानसभेवेळी तर निकषात न बसलेल्या पाच लाख महिलांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आली. आता अपात्र महिलांची छाननी करण्यात आली. यामुळे सरकारची मोठी रक्कम वाचली.असे म्हणावे लागेल. पण ही रक्कम वाचवण्यासाठी येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा फटका बसू नये अशी चिंता नेत्यांना वाटू लागली आहे.
ही तर च्या मतदारांना लाच
लाडक्या बहिणींच्या यादीत कपात झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. हे असं होणारच होतं. ते लोकांच्या आता लक्षात आलं आहे. ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी, आनंदाचा शिधा वा इतर सुरू करण्यात आलेल्या योजना, मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरती होती, असा घणाघात शेट्टी यांनी केला.
इंदापूर चा लाडका भाऊ कुठं गेला..?
इंदापूर तालुक्यातील हजारो महिलांना या लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र केल्यामुळे आता हीच बहीण आपल्या लाडक्या भावाने आपली गोड बोलून फसवणूक केली असे म्हणू लागली आहे.