March 3, 2025 9:45 am

बोराडी येथे जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत जलसाक्षरता दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी येथे जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत जलसाक्षरता दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न…

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन व जिल्हा परिषद धुळे पंचायत समिती शिरपूर आणि देवऋषी एज्युकेशनल सोसायटी देहरादून यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत जलसाक्षरता दोन दिवशीय प्रशिक्षण बोराडी येथील फार्मसी इन्स्टिट्यूट कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाले.
या जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत जलसाक्षरता दोन दिवशीय प्रशिक्षण वर्गासाठी शिरपूर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री देवरे, पाणी पुरवठा समितीचे सदस्य सुनिता सगरे, प्रशिक्षक पुरुषोत्तम मोतीपवळे, प्रकाश ठाकरे, सहाय्यक आकाश भालेराव, माजी सभापती सत्तासिंग पावरा,बोराडी ग्रामपंचायत सरपंच सुखदेव मालचे, वकवाड सरपंच सुकलाल पावरा, मालकातर सरपंच कमलबाई पावरा, कोडीद सरपंच आरती पावरा, चोंदी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच बापू पावरा, माजी पंचायत समिती सदस्य विश्वास पावरा,अंगणवाडी सेविका रंजना कोळी, सुंदराबाई सोनार, निंबा पाटील, योगेश पाटील,आशावर्कर अर्चना सतेसा, यांच्यासह एकूण २४ गावातील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,जलसुरक्षक व समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोराडी येथील फार्मसी इन्स्टिट्यूट कॉलेजच्या सभागृहात दि.२४ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंत दोन दिवशीय पाकिस्तानचे आयोजन महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन व जिल्हा परिषद धुळे पंचायत समिती शिरपूर आणि देवऋषी एज्युकेशनल सोसायटी देहरादून यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी परिसरातील एकूण चोवीस गावातील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जलसुरक्षक व समितीतील महिला सदस्य, अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षणात जलसाक्षरता अभियान, देखभाल दुरुस्ती, पाणीपट्टी, पेजल अंदाजपत्रक, जलजीवन मिशन मालकी व इतर असे एकूण दहा विषयावर व्याख्यान,गटचर्चा,अभ्यास खेळ च्या मध्मातून प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षक पुरुषोत्तम मोतीपवळे, प्रकाश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक आकाश भालेराव यांनी पाणीपुरवठा याविषयी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना दोन दिवशी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी शिरपूर पंचायत समितीचे माजी सभापती जयश्री देवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश भालेराव यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!