जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा सदस्य नोंदणीसाठी इंदापूर तालुक्याचा झंझावाती दौरा.
(५०,००० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन )
इंदापूर(निलेश गायकवाड)
भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी इंदापूर विधानसभेचा दौरा केला. तालुक्यातील भारतीय जनता पार्टी बरोबर काम करणाऱ्या युवक सहकारी, पदाधिकारी, व्यापारी वर्ग यांच्या भेटी घेऊन कार्यकर्त्याला येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच सदस्य नोंदणी अभियानाबाबत विस्तृत अशी माहिती सांगितली. तसेच जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे . राज्यात आपण मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत त्यामुळे इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही.विकास निधीमध्ये तुम्हाला योग्य न्याय दिला जाईल तसेच इंदापूर तालुक्याचा असणारा ज्वलंत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घालून देण्याचे ही आश्वासन जिल्हाध्यक्ष यांनी दिले.
येणाऱ्या काळामध्ये शतप्रतिशत भाजपा इंदापूर मध्ये केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी सांगितले आतापर्यंत १२५०० सदस्य नोंदणी इंदापूर तालुक्यात झाल्याचे तालुकाध्यक्षांनी सांगितले. त्याचबरोबर येत्या काळामध्ये कमीत कमी ३५००० व जास्तीत जास्त ५०००० पर्यंत सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
भिगवन पासून दौऱ्याला सुरुवात झाली.भिगवन,मदनवाडी,पिलेवाडी,काझड,वालचंदनगर,रणगाव,निमगावकेतकी,इंदापूरशहर,बाभूळगाव,पळसदेव अशा गावातील भाजपा पदाधिकारी यांच्या घरी जिल्हाध्यक्ष यांनी भेटी दिल्या.सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्यानंतर कुटुंबासहित पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती वणवे,तालुकाध्यक्ष तेजस देवकाते,जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे,युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ पठारे, शहराध्यक्ष किरण गानबोटे,ज्येष्ठ नेते सदानंद शिरदाळे, जिल्हा सचिव प्रेमकुमार जगताप,रवींद्र पाटील,दिनेश मारणे,राजेंद्र जमदाडे, तानाजी मारकड,प्रवीण कुमार शहा आदी पदाधिकारी यावेळी दौऱ्यामध्ये उपस्थित होते.
राज्यात आपण मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही.विकास निधीमध्ये तालुक्याला योग्य तो न्याय दिला जाईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहून विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करावा.
– श्री.वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा.