June 29, 2025 3:04 am

रोहिणी माध्यमिक विद्यालयात काॅपीमुक्त अभियान मार्गदर्शन सभा संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोहिणी माध्यमिक विद्यालयात काॅपीमुक्त अभियान मार्गदर्शन सभा संपन्न…

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) आजच्या स्पर्धा युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर देऊन होणाऱ्या परीक्षा ह्या कॉफी मुक्त करून आपले व आपल्या शाळेचे नाव कसे उज्वल करता येईल याकडे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला आपले संस्थेचे अध्यक्ष प्रेरणामुर्ती डॉ. तुषार रंधे हे वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. परीक्षा ही संधी समजून आपण भविष्यात चांगलेच नाव कमावण्याचे आवाहन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी. सोनार यांनी रोहिणी माध्यमिक विद्यालयात काॅपीमुक्त अभियान मार्गदर्शन सभेत बोलत होते.
रोहिणी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची सहविचार सभा संपन्न झाली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बन्सिलाल प्रताप बंजारा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक प्रल्हाद दगडू सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली.
सहविचार सभेचे प्रास्ताविक एच. एच. शिरसाठ यांनी केले. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२५ काॅपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह साजरा होत असून परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीक्षा मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षक योगेश एन. गुरव यांनी विद्यार्थी व पालकांना काॅपीमुक्त परीक्षेची शपथ दिली.
यावेळी धनगर पावरा, अमरसिंग पावरा, भूपेश बंजारा, सागर भील, भरत बंजारा, गोविंद बंजारा, दिलवरसिंग पावरा, लव बंजारा, ललित पवार, दिपक कोळी आदि पालक उपस्थित होते. उपशिक्षिका वर्षा पाटील, वरिष्ठ लिपिक अंबादास सगरे, उपशिक्षक आर. एन. पावरा, आर. बी. सुर्यवंशी, विजय बागुल, आर. डी. डुडवे, सुनिल राठोड, एम. व्ही. सुळे, नितिन शिंदे, यांचेसह शिपाई संजय वाघ व संजय तिरमले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय बागुल यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!