मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री
अमळनेर : विक्की जाधव
मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग प्रेमिकांचा उत्साह शहरात उफाळून आला आहे. परंतु याच उत्साहात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे, ज्यामुळे जनजीवनासाठी एक गंभीर आव्हान निर्माण झाले आहे.
अमळनेर शहरातीलकाही दुकानदार नायलॉन मांजा विक्री करून प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पाखरे उडवत आहेत,
पक्षी मित्रांवर या गंभीर स्थितीत पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे, कारण नायलॉन मांजामुळे पक्षांचे जीवन धोक्यात येऊ शकते. पक्षांचे संरक्षण करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे.
तसेच, नागरिकांना “मार्मिक”चे आव्हान आहे की, वाहन चालवताना काळजीपूर्वक चालवा. नायलॉन मांजामुळे अचानक जीव गमावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तसे बघतही असाल त्यामुळे या बाबतीत जागरूकता ठेवण्याची अपील करण्यात येत आहे.