नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासाचे लवकर निराकरण करा खा. स्मिता वाघ
अमळनेर : विक्की जाधव.
मतदार संघातील रेल्वेचे सर्वच अंडरपास बोगदे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून याबाबत प्रवाश्यांना होणाऱ्या नाहक त्रास थांबवावा अशा सूचना खासदार स्मिता वाघ यांनी जिल्हा नियोजित बैठकीत दिले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे होत्या. दरम्यान देशातील सर्वच अंडरपास बोगद्यांची अवस्था अशीच असल्याने सभागृहात शून्य प्रहरात हा विषय मांडणार असल्याचेही स्मिता वाघ यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने गेट बंद करण्यासाठी अंडरपास व ओव्हर ब्रिज चा पर्याय काढला. अनेक ठिकाणी भूजल पातळी वर असल्याने सतत अंडरपास बोगद्यात पाणी साचते. त्यामुळे प्रवाश्याना त्रास होतो. अंडरपास बोगद्याबाबत तज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करून समस्या कायमची मिटवावी अशी मागणीही खासदार वाघ यांनी केली आहे.
यावेळी जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे , आमदार राजुमामा भोळे , आमदार अमोल पाटील , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.