June 29, 2025 8:07 am

‘प्रताप महाविद्यालय हे पालन – पोषण करणारे केंद्र’ – डॉ. रोहित धर्माधिकारी  

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘प्रताप महाविद्यालय हे पालन – पोषण करणारे केंद्र’ – डॉ. रोहित धर्माधिकारी  

 

अमळनेर : विक्की जाधव

येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ.रोहित धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करावी . मेहनत करून प्रताप महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे. प्रताप महाविद्यालय हे पालन – पोषण करणारी आई आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संदेशजी गुजराथी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शैक्षणिक गुणवत्तेबरोबर कला व क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवावा. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी केले. तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.सी.बी. सुर्यवंशी यांनी करून दिला.

 

या प्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,विश्वस्थ सौ.वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, डॉ. अनिल शिंदे ,जेष्ठ संचालक हरी भिका वाणी, संचालक योगेश मुंदडा, प्रदिप अग्रवाल, खा.शि.मंडळ सचिव तथा प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन,प्राध्यापक प्रतिनिधी तथा उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.विजय तुंटे , प्रा.सी.बी. सुर्यवंशी सहसचिव डॉ. धीरज वैष्णव,उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, डॉ.व्ही बी मांटे , डॉ.योगेश तोरवणे, डॉ.कल्पना पाटील, आदी उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश माने व प्रा.प्रतिमा लांडगे यांनी केले तर आभार स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी मानले. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ तसेच कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!