जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी येथे बाजार डे साजरा..
प्रतिनिधी: अजिनाथ कनिचे
जि. प. प्राथमिक शाळा तांदुळवाडी (ता. माढा) येथे बाजार डे उत्साहात साजरा करण्यात आला.
या बाल आनंद बाजार मेळाव्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळे, संक्रातीनिमित्त स्टेशनरी सामान तसेच खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पॅटीस, भजे, समोसे, गुलाब जामुन, बालुशाही, भेळ, पाणीपुरी, पाणी बाटली व चहा असे विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आणलेल्या सगळ्याच पदार्थाची विक्री झाली. या बाल आनंद मेळाव्यामध्ये सुमारे १० ते १२ हजार रुपयांची उलाढाल झाली. यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान समजले. आणि खरेदी-विक्री म्हणजे काय? याचेही अनुभूती आली.
या कार्यक्रमासाठी सरपंच रणजितसिंह पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजिनाथ (बापू) परबत, नवनाथ गवळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट, तसेच उपाध्यक्ष सर्व सदस्य, सर्व पालक, शिक्षण प्रेमी नागरिक, माजी विद्यार्थी या सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. व विद्यार्थ्यांनी आणलेले सर्व साहित्य खरेदी केले.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक खटाळ सर, जाधव सर, कुंभार सर व राक्षे मॅडम या सर्वांनी परिश्रम घेतले.