दि.११ जानेवारी रोजी शिरपूर येथील एस.पी डि.एम.महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थाचा मेळावा कर्मवीर दालनात आयोजित करून सहकार भारती स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम थोर स्वातंत्र्य सैनिक शिक्षणमहर्षी कर्मवीर स्व. आण्णासो व्यंकटराव रंधे यांचा प्रतिमेस पुष्पहार श्री दिलीप लोहार यांचे हस्ते अर्पण करून भारतमाता व संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांचे प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डाॅ.दिनेश बक्कड सर ,वाणिज्य विभागाचे प्रा.सौ.पवार मॅडम,प्रा. पावरा सर, विका सोसायटीचे प्रदेश प्रकोष्ठ प्रमुख प्रकाशसिंग सिसोदिया यांचे हस्ते करण्यात आले
श्री दिलीप लोहार यांनी सहकार भारतीचे कार्य विस्तार व आगामी काळातील युवकांचे योगदान याविषयी तर प्रकाशसिंग सिसोदिया यांनी सहकारी संस्थेतील यशस्वी वाटचाल, सहकाराचा माध्यमातून शेतकरीवर्गाचा विकास व उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डाॅ.दिनेश बक्कड सर यांनी सहकार भारतीचा कार्याचा गौरव केला व विद्यार्थांनी सहकार क्षेत्रातील महत्त्व समजुन आगामी काळात सक्रीय योगदान करावे असे आवाहन केले महाविद्यालयाचे संस्था प्रमुख व प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांनी कार्यक्रमासाठी अद्यावत हाॅल व इतर व्यवस्थेचे नियोजन करुन दिले याबाबत सहकार भारतीचा वतीने आभार व्यक्त करण्यात आले.