June 28, 2025 10:48 pm

आदिवासीच्या समस्या सोबतचं भ्रष्टाचारा विरोधात निर्भीड पत्रकारिता करणारा पत्रकार मुकेश चंद्रकर यांची निर्घृण हत्या

अपनी भाषा में पढ़े! Translate

आदिवासीच्या समस्या सोबतचं भ्रष्टाचारा विरोधात निर्भीड पत्रकारिता करणारा पत्रकार मुकेश चंद्रकर यांची निर्घृण हत्या

 

मार्मिकन्यूज नेटवर्क :

छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला एसआयटीच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केली आहे. दुसरीकडे, हत्या झालेल्या मुकेश चंद्राकर यांचा शवविच्छेदन अहवाल देखील समोर आला आहे. या अहवालात त्यांच्यावर मृत्यूआधी करण्यात आलेल्या क्रूर अत्याचाराचे पुरावे समोर आले आहेत. शवविच्छेदनानंतर या हत्येत दोनहून अधिक जणांचा सहभाग असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

छत्तीसगडमध्ये रोड माफियांचा भ्रष्टाचार उघड करणारे निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. एक आरोपीच्या मुसक्या अवळल्या असून काही आरोपी अजूनही मोकाट आहेत. खरंतर व्यवस्थेच्या ‘राजाश्रयाशिवाय’ असे खून होणे आणि आरोपी मोकाट फिरणे शक्यच नाही.

मुकेश चंद्राकर फक्त भ्रष्टाचार विरोधातच नाही तर आदिवासींच्या समस्या सुद्धा जगापुढे मांडत असत. त्यांचा खून म्हणजे लोकशाही चा सामूहिक बलात्कारचं होय. आजच्या काळात निर्भीडपणे सत्य बोलणे आणि लिखाण करणे आज जितके कठीण, तितकेच गरजेचेही आहे! आणि आम्ही तें सतत मांडू मार्मिक.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!